# 10 वी आणि 12 वीचा निकाल कधी?

# 10 and 12 Result 2020

कोरोना परिस्थितीमुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. याआधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं संकेत दिले होते.
महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. 12वीची परीक्षा पूर्ण झाली होती. मात्र, 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यातच 10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार याची सर्व विद्यार्थी आणि पालक वाट पाहून होते. अखेर, राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेचा अंदाज स्पष्ट करण्यात आला आहे.
12 वीचा निकाल 15 जुलै दरम्यान तर 10 वीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागेल, अशी माहिती राज्य मंडळ अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली आहे.
सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान ही माहिती देण्यात आली.

बोर्डाचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

# या वेबसाईटवरीलरिझल्ट लिंकवर” क्लिक करा.
# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

#  😛  नव-नवीन चालू घडामोडींसाठी आम्हाला रोज भेट द्या, https://jobmaza.net