Engineering Admission 2020, ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) इंजिनीअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ सप्टेंबरपासून, तर नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तसेच या वेळापत्रकानुसार राज्यांना पहिली गुणवत्ता यादी २० ऑक्टोबरपूर्वी जाहीर करावी लागणार आहे.

इंजिनीअरिंगचे वर्ग १ सप्टेंबरपासून; सुधारित वेळापत्रक जाहीर ~ Engineering Admission 2020

इंजिनीअरिंगचे वर्ग १ सप्टेंबरपासून; सुधारित वेळापत्रक जाहीर

# Engineering Admission 2020

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेजे बंद आहेत. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर होत आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर आवश्यक जेईई सप्टेंबरमध्ये होणार आहे, तर राज्यांनाही आता त्यांच्या प्रवेश परीक्षा सप्टेंबर महिन्यातच पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. कारण परिषदेने दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार २० ऑक्टोबरपूर्वी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी १ नोव्हेंबरपर्यंत जाहीर करावी लागणार आहे. तर इंजिनीअरिंगचे वर्ग हे १ नोव्हेंबरपासून सुरू करावेत असेही परिषदेने सूचित केले आहे. यामुळे राज्य सरकारना १ नोव्हेंबरपर्यंत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्ण करावे लागणार आहे.

आता राज्य सरकार इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेबाबत काय निर्णय घेते यावर पुढील प्रक्रिया अवलंबून असणार आहे. सरकारला प्रवेश परीक्षेबाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. आता तरी सरकारने लवकरात लवकर प्रवेश परीक्षेबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

मुक्त शिक्षण दोन सत्रांत
विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त शिक्षण दोन सत्रात घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश विद्यार्थी मुक्त शिक्षणाकडे वळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त शिक्षणात प्रवेश घेताना या शिक्षणाचा कालावधी हा १२ महिन्यांचा असणे आवश्यक आहे असे स्पष्ट करत यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर व फेब्रुवारी-मार्च अशा दोन सत्रांत विद्यार्थ्यांना प्रेवश द्यावेत असे सूचित केले आहे. यानुसार तंत्र शिक्षण परिषदेनेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मुक्त शिक्षण सत्र दोन सत्रांत घेण्याचे ठरविले आहे. यानुसार पहिल्या सत्रांतील प्रवेश ३० ऑगस्टपूर्वी, तर दुसऱ्या सत्रातील प्रवेश २८ फेब्रुवारी २०२१ पूर्वी होणे बंधनकारक असणार आहे.

# नवीन वेळापत्रक:-

 • सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे नव्या शैक्षणिक वर्ष :- १ सप्टेंबर
 • पहिली प्रवेश फेरी :- २० ऑक्टोबरपूर्वी
 • दुसरी प्रवेश फेरी :- १ नोव्हेंबरपूर्वी
 • नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात :- १ नोव्हेंबर
 • प्रवेश रद्द करण्याची मुभा :- १० नोव्हेंबर
 • रिक्त जागांवर प्रवेश :- १५ नोव्हेंबरपर्यंत

# आम्हाला रोज भेट देत रहा,
JobMaza.net


# Engineering Admission 2020

The All India Council for Technical Education ‘ in (AICTE) Engineering and has announced a revised timetable admission to various professional courses. According to this, the classes of the students who are currently studying will start from September 1 , while the classes of the newly admitted students will start from November 1. Also, according to this schedule, the states will have to announce the first quality list before October 20.

Engineering classes from September 1; Revised Schedule Announced ~ Engineering Admission 2020

Engineering Admission 2020

Schools and colleges are closed due to the lockdown announced to prevent the spread of Corona. This is delaying the start of this academic year. While the nationally required JEE for engineering admissions will be held in September, states will now also have to complete their entrance exams in September. As per the revised schedule given by the council, the first quality list is expected to be released before October 20. After that, the second quality list will have to be announced by November 1. The council has also suggested that engineering classes should start from November 1. As a result, the state government will have to complete the admission of vocational degree courses by November 1.

Now the next process will depend on what the state government decides on the engineering entrance exam. The government is expected to take an immediate decision on the entrance test. Now, there is a demand for the government to take a decision on the entrance test as soon as possible.

Open Education in Two Sessions:-

The University Grants Commission has issued instructions to conduct open education in two sessions. Given the prevalence of corona, it is expected that most students will turn to open education. In this regard, the University Grants Commission has clarified that the duration of this education should be 12 months while enrolling in open education and has suggested that students should be admitted in two sessions namely September-October and February-March this year. Accordingly, the Technical Education Council has also decided to conduct open education sessions of vocational courses in two sessions. Accordingly, admission in the first session will be mandatory before August 30, while admission in the second session will be mandatory before February 28, 2021.

# New Schedule: –

 • New academic year for students currently studying: – 1st September
 • First entry round: – Before 20th October
 • Second entry round: – Before 1st November
 • Beginning of academic year for newly admitted students: – 1st November
 • Permission to cancel admission: – 10 November
 • Admission to Vacancies: – Till 15th November

# Keep visiting us every day ,
JobMaza.net