#आरोग्य विभाग भरती-2020
#Latest Current Affairs 2020
मुंबई : करोना सोबत लढताना आरोग्य विभागातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी अतोनात प्रयत्न चालू आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागातील 17000 जागा भरली जाणार आहेत. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदे जलद गतीने भरण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिले आहे.
 
राजेश टोपे यांनी मंगळवारी लॉंकडाउनचे टप्पे समजत असताना, करोना बाबतची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर सरकार चे खूप मोठ्या प्रमाणावर उपाय योजना चालू आहे. करोना च्या काळामध्ये आता मान्सून येण्या पूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मलेरिया, डेंगू,हिवताप तसेच अन्य पावसाळी साथीचे रोगांपासून संरक्षण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभागातील 17000 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. नियुक्त आणि भरतीसाठी गरज असल्यास अतिरिक्त समितीच्या लवकरात लवकर बनवाव्या मुलाखती साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सूचना द्याव्यात असे ते म्हणाले.
 
करोना बाधितांबाबत सहानुभूती बाळगावी करोना विरुद्धच्या या लढ्यात शिक्षित वा सुजाण नागरिक हि भावना बाळगावी पण माणुसकी घालवू नका. अनेक ठिकाणी संशयित रुग्ण किंवा अलगीकरण असलेल्या व्यक्ती परिवारास सोबतच चुकीच्या वर्तनाची माहिती समोर येत आहे. ही बाब पूर्णतः चुकीची आहे. करोनाबाबत शिक्षित सुजाण राहून आपण आपल्या अंगी असलेले माणुसकी कधी विसरू नका, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
******हे पण बघा :भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती २०२० ~ Sports Authority of India Recruitment 2020
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईट, www.jobmaza.net