#HCL Technologies- अध्यक्षपदी महिला विराजमान

#चालू घडामोडी 2020
देशातील पहिल्या पाचमधील माहिती तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या अध्यक्षपदी संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या रोशनी नाडर-मलहोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
1) ८.९ अब्ज डॉलरच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध तंत्रज्ञान कं पनीचे नेतृत्व करणाऱ्या रोशनी या पहिल्या महिला ठरल्या आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर अब्जाधीश, तरुण उद्योजक, महिला व्यावसायिकांच्या यादीत त्यांची अव्वल म्हणून नोंद झाली आहे. कंपनीतील पद व नेतृत्वबदलाची माहिती भांडवली बाजारालाही देण्यात आली.दरम्यान, कंपनीच्या समभागावर सत्रअखेर गुंतवणूकदारांच्या नफे खोरीने विक्री दबाव अनुभवला गेला.
2) एचसीएल टेक्नॉलॉजिजचे जूनअखेर तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष सप्ताहअखेर जाहीर झाले. त्याचबरोबर रोशनी या पिता शिव नाडर यांच्याकडून कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेत असल्याची घोषणाही करण्यात आली. शिव नाडर हे या पदावरून पायउतार होत असून रोशनी यांच्याकडे एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार कायम राहणार आहे. ९.९ अब्ज डॉलरच्या एचसीएल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत एचसीएल टेक्नॉलॉजिजसह एचसीएल इन्फोसिस्टिम्स, एचसीएल हेल्थके अर आदी व्यवसाय कंपन्या आहेत.
3) प्रसार माध्यमांमध्ये विशेष रुची असलेल्या शिव यांच्या कन्या रोशनी या एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या संचालक मंडळात सर्वप्रथम २०१३ मध्ये रुजू झाल्या.येथे त्यांनी उपाध्यक्षपदाची भूमिकाही बजाविली. एचसीएल समूहात येण्यापूर्वी त्यांनी सीएनएनसारख्या इंग्रजी वाहिन्यांमध्ये वृत्त निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडली. एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्याधिकारीपदाची माळ त्यांच्या गळ्यात वयाच्या २७ व्या वर्षीच पडली. ४० च्या आतील युवा उद्योजक म्हणून त्या फोर्ब्ससारख्या यादीत त्या झळकल्या आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
******हे पण बघा :नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२० ~ Navi Mumbai Municipal corporation Recruitment 2020
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आम्ही तुमच्यासाठी दररोज नोकरीच्या संदर्भातील नव-नवीन जाहिराती घेऊन येत असतो. तुमच्या मित्रांना आमच्या वेबसाईट बद्दल नक्की सांगा. तुमची सर्वांची आवडती, एकमेव व अचूक माहिती देणारी साईट,www.jobmaza.net