# राज्यात मोठी पोलीस भरती १० हजार जागा भरणार

Maharashtra Police Bharti 2020, कोरोनामुळे राज्यातील पोलिस यंत्रणांवरचा वाढलेला ताण कमी करण्यासाठी “पोलिस शिपाई” पदासाठीच्या “10000 जागांवर” भरती करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत केली. नागपूर येथील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी या प्रसंगी दिली. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. यानंतर त्यांनी या घोषणा केल्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलिस भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल याचा विचार करून सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.
दरम्यान, बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी उपस्थित होत्या.

# आठऐवजी दहा हजार जागा केल्या मंजूर:-

गृहविभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून देत एकूण १० हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

# हे प्रश्न अनुत्तरित:-

  • वर्षभरात म्हणजे कधी हाेणार भरती?
  • नेमकी कोणत्या जिल्ह्यात ही प्रक्रिया घेतली जाणार?
  • कोरोनानंतर भरतीसाठी गाइडलाइन काय असेल?

# अशी हाेते फिजिकल:-

  • महिला :- ८०० मीटर, १०० मीटर धावणे, गाेळाफेक, उंच-लांब उडी
  • पुरुष :- १६०० मीटर, १०० मीटर, ८०० मीटर धावणे, गाेळाफेक, उंच-लांब उडी

# लॉकडाऊनमुळे मैदाने उपलब्ध नसल्याने शहरी भागातील तरुणांची अडचण:-

२२ मार्चनंतर टप्प्याटप्प्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने पोलिस भरतीसाठी रनिंग आणि फिजिकल करणाऱ्या तरुण-तरुणींना असंख्य संंकटांचा सामना करावा लागत आहे. पोलिस भरतीची घोषणा झाली असली तरी अजूनही धावणे आणि कवायतीसाठी मैदानेच उपलब्ध नसल्याने शहरी भागातील तरुणांचा सराव बंद पडला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात रात्री किंवा भल्या पहाटे तरुणांनी धावण्याचा सराव सुरू केला असल्याचे चित्र आहे.
# NHM GONDIA-राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२० ~ NHM Gondia Recruitment 2020

# आमच्या या वेबसाईट विषयी तुमच्या मित्रांना नक्की सांगा, 😆

आता तरी पुढे हाचि उपदेश।
नका करू नाश आयुष्याच्या।।

सकळांच्या पाया माझे दंडवत।
आपुलाले चित्त शुद्ध करा।।

Jobmaza.Net

# Maharashtra Police Bharti 2020

Maharashtra Police Bharti 2020, Deputy Chief Minister Ajit Pawar on Tuesday announced the recruitment of ” 10000 posts” for the post of “police constable” to reduce the increased stress on the police system in the state due to corona Ajit Pawar also informed that a decision has been taken to set up a women’s battalion of the State Reserve Police Force (SRPF) at Katol in Nagpur. An important meeting was held under the chairmanship of Pawar in his hall in the Ministry on Tuesday. He then made these announcements. Deputy Chief Minister Ajit Pawar also directed that a comprehensive proposal be tabled in the Cabinet meeting immediately considering how the police recruitment process can be carried out successfully without any hindrance in the wake of the Corona crisis. He also clarified after the meeting that the recruitment process would be completed within the next year.
Meanwhile, Home Minister Anil Deshmukh, Additional Chief Secretary of Home Department Sitaram Kunte, Special Principal Secretary Amitabh Gupta, Director General of Police Subodh Jaiswal and Additional Director General of Police Archana Tyagi were present at the meeting.

# Ten thousand seats sanctioned instead of eight: –

The Home Department had proposed to fill 8,000 posts of police constables in the meeting. However, Deputy Chief Minister Ajit Pawar directed to add another 2,000 posts and recruit a total of 10,000 police personnel and complete the recruitment process within the next one year .

# These unanswered questions: –

  • When will the recruitment take place during the year?
  • In which district will this process be conducted?
  • What will be the guideline for recruitment after Corona?

# Physical in such hands: –

  • Women:- 800m, 100m, sprint, high and long jump
  • Men:- 1600m, 100m, 800m, sprint, long jump

# Problems of youth in urban areas due to unavailability of ground due to lockdown: –

Due to the phased lockdown after March 22, the youths who are running and doing physical work for police recruitment are facing innumerable problems. Despite the announcement of police recruitment, the practice of youth in urban areas has come to a standstill as there is still no ground available for running and maneuvering. In rural areas, on the other hand, there is a picture of young people starting to practice running at night or early in the morning.

# Be sure to tell your friends about our website, 😆

Jobmaza.Net