TCS Recruitment 2020, संकटाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात केली आहे. पण अशा संकटाच्या काळातही काही कंपन्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने कोरोनाच्या संकटातही कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. टीसीएसने देशभरातील कॅम्पसमधील 40 हजार फ्रेशर्सना नोकर्‍या देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीही कंपनीने मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या होत्या. कोरोनाच्या संकटातही टीसीएसनं भरती काढल्यानं ती महत्त्वाची आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या बऱ्याच कंपन्या एक तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहे, पण टीसीएसने यापैकी काहीही केलेले नसून उलट ती नव्या भरती करत आहे.

नोकऱ्यांची सुवर्णसंधी, टाटांची TCS मंदीतही देतेय ४० हजार तरुणांना रोजगार ~ TCS Recruitment 2020

TCS Recruitment 2020

# अमेरिकेतही नोकऱ्यांची दुप्पट संधी

एवढेच नव्हे, तर टीसीएसने अमेरिकेतील कॅम्पस प्लॅटमेंट्स यंदा दुप्पट नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी नुकतेच सांगितले की, “मागणीतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता कंपनी हळूहळू रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात करीत आहोत. कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे ते थांबविण्यात आले होते, परंतु आम्ही आमच्या सर्व योजनांचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत.

# TCSचा नफा आला खाली

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकड्यांनुसार टीसीएसचा नफा एप्रिल ते जून या तिमाहीत 13 टक्क्यांनी घसरून अवघ्या 7,049 कोटी रुपयांवर आला आहे. हे कोरोनाच्या संकटामुळे झालेले नुकसान आहे.

# कॅम्पस हायरिंगमध्ये मोठी घट

Firstnaukri.com च्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार कोरोना विषाणूमुळे यावर्षी महाविद्यालयांमध्ये कॅम्पस हायरिंग 82 टक्क्यांनी घटली आहे. इतकेच नव्हे, तर प्री-फायनल इयर्सच्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपमध्ये 74 टक्क्यांनी घट झाली आहे. सर्वेक्षणानुसार नोकरीच्या 44 टक्के ऑफरची जॉयनिंग डेट पुढे ढकलण्यात आली आहे, तर केवळ ९ टक्के ऑफरच मागे घेण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात सामील झालेल्या जवळपास 33 टक्के कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, वरिष्ठ अधिकारी त्यांना नोकरीच्या स्थितीविषयी कोणतीही माहिती देत ​​नाही.

# आमच्या वेबसाईट विषयी तुमच्या मित्रांना नक्की सांगा, 😆 
Jobmaza.net


# TCS Recruitment 2020

TCS Recruitment 2020, in the wake of the crisis, many companies have given coconuts to employees. So some companies have made big cuts in employee salaries. But even in times of crisis, some companies are providing employment to the unemployed. Tata Consultancy Services (TCS), an IT company, has also given relief to its employees in the Corona crisis. TCS has announced to provide jobs to 40,000 freshers on campus across the country. Last year, too, the company hired a large number of freshers. It is also important in the corona crisis as TCS recruits. Many companies facing financial crisis are firing their employees, while some companies are cutting their salaries, but TCS has not done any of this and is hiring new employees.

Golden job opportunities, Tata's TCS also provides employment to 40,000 youth in recession

TCS Recruitment 2020

# Double job opportunities in America too

Not only that, but TCS has decided to double the number of campus placements in the US this year. TCS CEO Rajesh Gopinathan recently said, “Given the positive demand environment, the company is slowly starting to provide employment. It was stopped because of Corona’s uncertainty, but we are determined to follow all our plans.

# TCS’s profit came down

TCS Recruitment 2020, According to data released last week, TCS’s profit fell 13 per cent to Rs 7,049 crore in the April-June quarter. This is the damage caused by the corona crisis.

# Big drop in campus hiring

According to a recent survey by Firstnaukri.com, campus hiring in colleges has dropped by 82 percent this year due to the corona virus. Not only that, but internships for pre-final year students have dropped by 74 percent. According to the survey, 44 per cent of job offers have been postponed, while only 9 per cent have been withdrawn. Nearly 33 per cent of employees surveyed say that senior executives do not give them any information about their job status.

Be sure to tell your friends about our website, 😆 
Jobmaza.net